Google — Year in Search 2020

Google — Year in Search 2020

SUBTITLE'S INFO:

Language: Marathi

Type: Human

Number of phrases: 77

Number of words: 667

Number of symbols: 4059

DOWNLOAD SUBTITLES:

DOWNLOAD AUDIO AND VIDEO:

SUBTITLES:

Subtitles prepared by human
00:01
[इलेक्ट्रॉनिक म्युझिक] [पुरुषाचा आवाज] का?' हे जाणून घेणं हा मनुष्याचा गुणधर्मच आहे ["का"] [“का”] जगातल्या सर्वांचीच परीक्षा पाहणाऱ्या या वर्षात "का?" चा सर्वाधिक शोध घेतला गेला [वेगवेगळे आवाज वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रश्न विचारत आहेत] [संगीत अचानक थांबते] [गंभीर स्वरातील क्वायर सुरू होते] ["या आजाराला कोव्हिड-19 का म्हणतात"] [ब्रिटिश महिला वृत्तनिवेदकाचा आवाज] कोरोनाव्हायरसच्या प्रसाराने आता उच्चांक गाठला आहे. [पुरुषाचा आवाज] आपल्याला सर्व उत्तरं मिळाली नाहीत, [उडतं म्युझिक] पण आपण शोध घेणं थांबवलं नाही ["मंगळ लाल रंगाचा का आहे"] [प्रक्षेपणाच्या वेळचा स्त्रीआवाज] लिफ्ट-ऑफ! ["पॅरासाइट हा चित्रपट इतका चांगला का आहे"] [पुरुषाचा आवाज] काही प्रश्नांनी आनंद दिला तर काहींनी, एक्साइटमेंट [प्रोत्साहनपर आवाज] ["NBA सामने पुढे का ढकलले"] [जव्हाल मगी] लाइफ इन अ बबल! — डू यू लव्ह मी? — येस. — डू. यू. लव्ह. मी? — येस. [ब्रिटिश अ‍ॅक्सेंटमधील आवाज] इम्प्रॉपर फ्रॅक्शन' म्हणजे काय हे मलाच माहीत नाही ["मला इतकं थकायला का होत आहे"] इम्प्रॉपर फ्रॅक्शन' म्हणजे काय हे मलाच माहीत नाही मन विचलित करणाऱ्या साऱ्या गोष्टींना दूर ठेव. ["सगळे टॉयलेट पेपर्स का विकले गेलेत"] — आम्हाला एक टॉयलेट टिश्यू मिळाला लोकहो — थॅंक गॉड! तिथे ठेव आणि हे सुरू कर [लेस्ली जॉर्डनचा आवाज] व्हॉट यू ऑल डुइंग? [पुरुष आणि मुलगा आनंदाने आरोळी ठोकतात] आताशी मार्च आहे. मार्चमध्ये... आणखी किती दिवस? [संगीत अचानक थांबते] [पुरुषाचा आवाज] काही प्रश्नांनी आपल्याला रडवलं [गंभीर स्वरातील क्वायर सुरू होते] [कोबे ब्रायण्टचा आवाज] आपण काही क्षण विजयाचे पाहिले, तर काही पराजयाचे
01:03
महत्त्वाचं काय आहे तर, या सर्वात आपण कायम एकत्र उभे राहिलो [खूप लोक आनंदाने आरोळ्या ठोकत आहेत] आय लव्ह यू गाइज! ["ऑस्ट्रेलिया का जळत आहे"] [पुरुषाचा आवाज] काही प्रश्नांनी आपल्याला पृथ्वीच्या भविष्याविषयी चिंतेत पाडलं. ["इतके वणवे का लागत आहेत"] पृथ्वीच्या भविष्याविषयी चिंतेत पाडलं. ["इतके वणवे का लागत आहेत"] [महिला वृत्तनिवेदकाचा आवाज] अमेझॉनच्या जंगलात वणवे लागले आहेत ["आकाश नारिंगी का आहे"] [महिला वृत्तनिवेदकाचा आवाज] अमेझॉनच्या जंगलात वणवे लागले आहेत [पुरुषाचा आवाज] का इतक्या सर्वांना प्राण गमवावे लागले? [ब्रिटिश महिला वृत्तनिवेदकाचा आवाज] COVID-19 ने जगभरात आतापर्यंत जवळपास 15 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. ["का"] [पुरुषाचा आवाज] आपण अजूनही तेच ते प्रश्न का विचारतो आहोत? ["लोक का निषेध करत आहेत"] [वेगवेगळ्या बातम्यांमध्ये "जॉर्ज फ्लॉइड" ऐकू येत आहे] ["लोक का निषेध करत आहेत"] [एका वृत्तनिवेदकाचा आवाज] "मला श्वास घेता येत नाहीये" असं जॉर्ज फ्लॉइड वारंवार ऑफिसर्सना सांगत होता [पुरुषाचा आवाज] मग आपल्यामध्ये अजूनही पुढे जात राहण्याचं बळ का आहे? [क्वायरची आवर्तनं सुरू आहेत “गेट इट टूगेदर समहाऊ”] [स्त्रीचा आवाज] तुमच्या शक्तीवर माझा विश्वास आहे. ["ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर का सुरू आहे"] [लोक तिच्यापाठून म्हणत आहेत] तुमच्या शक्तीवर माझा विश्वास आहे. ["ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर का सुरू आहे"] आपल्या शक्तीवर माझा विश्वास आहे. [लोक तिच्यापाठून म्हणत आहेत] आपल्या शक्तीवर माझा विश्वास आहे. [एका वृत्तनिवेदकाचा आवाज] जगभरातल्या अनेक शहरांमध्ये “ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर” चा घोष ["रिओ डी जानेरो, लंडन, सिडनी, हेलसिंकी"] [लोक "ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर"च्या घोषणा देत आहेत] दुमदुमतो आहे [पुरुषाचा आवाज] आपण अजून हार का नाही मानली? [जॉन ल्युईसचा आवाज] आपण आता इतके पुढे निघून आलो आहोत की आता मागे परतणे नाही आपल्याला पुढे जात राहायचे आहे. [महिला वृत्तनिवेदकाचा आवाज] जगभरातील मदत घेऊन [वाढत्या लयीतले क्वायर “गेट इट टूगेदर समहाऊ"ची आवर्तने] विमाने बैरुतमध्ये उतरत आहेत [महिला वृत्तनिवेदकाचा आवाज] जगभरातील फायरफायटर्स कॅलिफोर्नियात येऊन पोहोचले आहेत. [महिला वृत्तनिवेदकाचा आवाज] जगभरात 100 हून अधिक कोरोनाव्हायरस लशींवर काम सुरू आहे
02:12
["परानुभूती का गरजेची आहे"] [एका माणसाचा आवाज] हा असा कालखंड आहे ज्यात ["परानुभूती का गरजेची आहे"] लोकच एकमेकांची काळजी घेत आहेत, रक्षण करत आहेत [पुरुषाचा आवाज] आपण पुढे जात राहिलो कारण यांनी आपल्याला दिशा दाखवली [रूथ बेडर गिन्सबर्ग] तुमच्या मुलीबाळींसाठी कसं जग असावं असं तुम्हाला वाटतं त्याबद्दल विचार करा ["लोकशाही का महत्त्वाची आहे"] [चॅडविक बोसमनचा आवाज] लक्षात ठेवा, हा संघर्षच तुम्हाला तुमच्या अंतिम ध्येयाप्रत घेऊन जाणार आहे. मान ताठ ठेवून पुढे जा आणि त्या पुढे जाण्यास अर्थ असू द्या. [पुरुषाचा आवाज] या वर्षाने आपल्याला इतक्या वाईट गोष्टी दाखवल्या, ["लोक स्वप्नं का पाहतात"] तरीही आपल्यामध्ये जिंकण्याची ईर्ष्या आहे ती का? [स्पोर्ट्स अनाउन्सरचा आवाज] माया गाबिएराची अफलातून कामगिरी [स्पोर्ट्स अनाउन्सरचा आवाज] नाओमी ओसाका. द यूएस ओपन चॅंपियनशिप. [एका माणसाचा आवाज] ना कोरोना आपल्याला थांबवू शकेल [चढत्या लयीतले संगीत] ना क्वारंटाइन. [पुरुषाचा आवाज] कारण, जोपर्यंत आपल्याला सर्व उत्तरं मिळणार नाहीत, [“वुई विल गेट इट टूगेदर समहाऊ” या क्वायर गीताने संगीत थांबते] ["शोध घेत राहू."] तोपर्यंत आपण शोध घेतच राहू..

DOWNLOAD SUBTITLES: