Google — Year In Search 2021

Google — Year In Search 2021

SUBTITLE'S INFO:

Language: Marathi

Type: Human

Number of phrases: 51

Number of words: 453

Number of symbols: 2576

DOWNLOAD SUBTITLES:

DOWNLOAD AUDIO AND VIDEO:

SUBTITLES:

Subtitles prepared by human
00:00
[“या वर्षी याआधीपेक्षा जास्त"] [एक विचार करायला लावणारी पियानोची धुन पुन्हा-पुन्हा वाजते] [“जगात या वर्षी याआधीपेक्षा जास्त शोध घेतला गेला”] [एक महिला क्षीण आवाजात बोलत आहे] हे वर्ष माझ्यासाठी फार कठीण होते. [“बरं कसं व्हायचं” स्पॅनिश भाषेत] [“बरं कसं व्हायचं” इंडोनेशियन भाषेत] [“बरं कसं व्हायचं” रशियन भाषेत] मी खचलेय. [“बरं कसं व्हायचं”] [“बरं व्हायचं”] आणि मी बरी होतेय. [“एखाद्याला मानवंदना कशी द्यायची”] [एका ब्रिटिश महिलेचा आवाज] मी आत्ता स्मारकापाशी आहे. [“एखाद्याला मानवंदना कशी द्यायची”] माझ्या आईच्या स्मरणार्थ मला काहीतरी करायचं होतं. [“अजून एक लॉकडाउन होईल का”] [एक महिला बोलते आहे] काही कारणांमुळे मला कसला तरी घोर लागलाय. हे काही विचित्र नाही कारण सध्या एवढं काही घडतंय. [“आपल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी कशी घ्यायची”] [नाओमी ओसाका बोलत आहे] मी थोडा काळ ब्रेक घेण्याचा विचार करतेय. [आयसॅक फ्रेरा बोलत आहे] तुम्ही यातून बाहेर पडणार आहात. आणि जर तुम्ही यातून बाहेर पडलात तर, [“खंबीर कसे राहायचे”] त्यानंतर काहीतरी खूप चांगलं तुम्हाला मिळणार आहे. [“मला लस केव्हा मिळेल”] [एका पुरुषाचा आवाज] इतर कोणत्याही व्यक्तीसारखाच, मी माझ्या समाजाला माझे छोटेसे योगदान देऊन वाचवण्याचा प्रयत्न करतोय. [एका महिलेचा आवाज] अरे वा! [“पुन्हा ठामपणे उभे कसे राहायचे”] [एका पुरुषाचा आवाज] सगळं पुन्हा उघडलंय याचाच आनंद होतोय. आणि मी मास्कच्या आतून हसतोय! [क्रीडा समालोचकांचा आवाज] दिवसाची अविश्वसनीय दृश्ये [“कमबॅक कसा करायचा”] फॅन्स परत आले. [लिन-मॅन्युएल मिरांडा बोलत आहे] थिएटरमध्ये परत एकदा स्वागत! [गर्दी जल्लोष करतेय] [बिली एलिश बोलत आहे] लोकहो, किती दिवसांनी आपण भेटतोय! [गर्दी जल्लोष करतेय] [“स्वतः आहोत तसे कसे राहावे”] [एलियट पेज बोलत आहे] जेव्हा तुम्ही स्वत:ला आरशात पाहता, तेव्हा तुम्ही म्हणता ”हेच. “माझे.खरे.स्वरूप.” [“माझा उद्देश काय आहे”] [मायकेल के. विल्यम्स बोलत आहे] प्रयत्न कमी होता कामा नये. यापुढेही, कधीही, स्वप्न पाहण्याचं थांबवू नका.
01:06
मला पर्वा नाहीये लोक तुम्हाला काय सांगतात त्याची. [प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाट करतात] [हळू-हळू स्वर मंदावून थांबतात] [न्यायमूर्ति पीटर ए कॅहिल बोलत आहेत] ...आम्हा ज्युरींना वरील अधिकारांनुसार ["पुढे कसे जायचे"] तिसऱ्या गुन्ह्यासाठी प्रतिवादी दोषी आढळला आहे. [ऑलिव्हिया रोड्रिगोच्या “ड्रायव्हर्स लायसन्स” चे स्वर घुमतात] [“आशियाई लोकांचा द्वेष थांबवा”] [सँड्रा ओह बोलत आहे] मला आशियाई असण्याचा अभिमान आहे. [गर्दी जल्लोष करतेय] [“माझा आवाज कसा उठवू”] [ब्रियाना फ्रुअन बोलत आहे] आम्ही बुडणार नाही, आम्ही लढत आहोत. [“पृथ्वीला कसे वाचवायचे”] [व्हानेसा नाकाटे बोलत आहे] आपण हवामानावरील अन्यायाबद्दल तोंड बंद ठेवू शकत नाही. कोणतीही कृती खूप छोटी नसते. [“तुमच्या समाजाची मदत अशी करा”] [एका पुरुषाचा आवाज] एक समाज म्हणून आपल्याला एकत्र यावेच लागेल आणि लोकांचे आयुष्य वाचवावे लागेल. [“मी माझ्या कुटुंबाला कधी भेटेन”] [अश्रुपूर्ण नयनांनी बोलत आहे] माझा मुलगा. [आनंदाने हसत आणि रडत आहेत] [अमांडा गोर्मन बोलत आहे] आणि आपण दु:खी झालो तरीही आपण प्रगती केली. [”आशावादी कसे राहावे”] आणि आपण दुखावलो तरीही आपण आशा सोडली नाही. आणि आपण दमलो तरीही आपण प्रयत्न केले. आणि आपण विजयी होऊन कायमचे एकत्र असू. [“आणखी कणखर होऊन परतण्याऱ्या प्रत्येक लढवय्यासाठी” ] [हळूहळू विरून जाणारे स्वर येत आहेत] [“शोध घेत राहू.”] [स्वर हळूहळू विरून जात आहेत]

DOWNLOAD SUBTITLES: